माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना समन्स

नागपूर: 
निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हेगारी प्रकरणाची माहिती लपवण्याच्या आरोप प्रकरणी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना स्थानिक कोर्टाने समन्स बजावले आहे. कोर्टाच्या वतीने नागपूर [ सदर] पोलिसानी हे समन्स फडणवीस याना दिले आहे. याबाबतची सदर बाजार पोलिसनी दिली आहे.

स्थानिक कोर्टात बजावलेले समन्स फडणवीस याना दिले आहे, अशी माहिती नागपूरमधील सदर बाजार पोलीस स्थानकाचे निरीक्षक महेश बनसोडे यांनी दिले आहे.


निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हेगारी प्रकरणाची माहिती लपविल्याच्या आरोप प्रकरणी याना क्लीन चिटदिल्याचा मुंबई हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवला आहे. तसेच प्रलंबित गुन्ह्याची फाईल पुन्हा उघडून सुनावणी करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते.

देवेंद्र फडणवीस याच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन सुप्रीम कोर्टने याआधी निवडा विधानसभा निवडणूक प्रतिज्ञा पात्रात दोन गुन्हेगारी प्रकरणाची माहिती लपवल्याचा आरोप या प्रकरणी अँड . सतीश उके यांनी याचिका दाखल केली होती . या प्रकरणी फडणवीस याना सुप्रीम कोर्ट ने नोटीस बजावली होती.

 फडणवीसयांनी निवडणुकी दरम्यान प्रतिज्ञा पत्रात दोन गुण्याबाबत माहिती लपवल्या प्रकरणाची याचिका अँड सतीश उके यांनी दाखल केली होती हि याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. या निर्णयाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. 

२०१४ मधील विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हे प्रकरणाची माहिती लपवल्याचा आरोप याचिकेत केला आहे.  या दोन प्रकरणाची नोंद १९९६ आणि १९९८ या मध्ये झाली होती. परंतु आरोप निश्चित झाला नव्हता. यातील एक गुन्हा फसवणुकीचा आहे. हे गुन्हे लपून प्रतिज्ञा पत्र सादर केल्याचा उके यांचा दावा आहे. 
थोडे नवीन जरा जुने