मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात : “ चार ठार “

सातारा :

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर रिसवाडी रसायनी गावाजवळ पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. एचपी गॅस टँकरला स्विफ्ट डिझायर करणे मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या भीषण अपघातांमध्ये स्विफ्ट डिझायर कारमध्ये प्रवास करत असलेल्या ५ महिला, एक  पुरुष यापैकी तीन महिला व एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी आहे. तिला उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. अपघतातील स्विफ्ट गाडीवर पालवे तसेच मेटकरी या नावाचे लग्नाचे स्टिकर होते. 


अपघतातील जखमी तसेच मृत हे सातारा येथील लग्न आटपून साताऱ्याहून मुंबईकडे जात असताना भरधाव स्विफ्ट डिझायरवरील नियंत्रण सुटल्याने चालकाने पुढे जाणाऱ्या गॅस टँकरला जोरात धडक दिली. अपघातानंतर जवळपास अर्धा किलोमीटर पर्यंत अपघातग्रस्त वाहन फरफटत नेल्याने मृतांचा आकडा वाढला गेला आहे.


महामार्ग पोलीस तसेच सुरक्षा यंत्रणेच्या मदतीने अपघताग्रस्त वाहन महामार्गावरून बाजूला केले. रसायनी पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत. 

थोडे नवीन जरा जुने