जीडीपी ५% वरून ४%

“सहा वर्षात सर्वात नीचांकी घसरण”  चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजे सप्टेंबर तिमाहीत आर्थिक विकास दर ५ वरून ४. ५ टक्क्यापर्यंत घसरला आहे. जून तिमाहीत जीडीपी दर ५ टक्के नोंदवला गेला होता. गतवर्षीच्या सप्टेंबर तिमाहीत हा दर सात टक्के इतका होता. विशेष म्हणजे दुसऱ्या तिमाही तील जीडीपी दराचे आकडे पाच टक्क्याच्या खाली येण्याचा अंदाज बहुतांश अर्थतज्ञांनी आणि आर्थिक संस्थानी व्यक्त केला होता. जीडीपी दर सहा वर्षाच्या नीचांकी स्तरावर आल्यानंतर सरकार आता कोणती पावले उचलणार , यादी सर्वांचे लक्ष लागले आहे. 

घसरणीला लागलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रातील रालोआ सरकारने महिला काही काळात अनेक निर्णयाची घोषणा केली होती. गट सप्टेंबर महिन्यात कॉर्पो रेट करदेखील कमी करण्यात आले होते. अर्थव्यवस्था चालना देण्यासाठी आगामी काळात रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात केले जाण्याचे संकेत मिळत आहेत. ३ ते ५ डिसेंबर दरम्यान रिझर्व्ह बँकेची पतधोरण आढावा बैठक होत असून या बैठकीत रेपो दर पाव टक्क्यांनी कमी होऊन ते ४. ९० टक्क्यावर आणले जाण्याची शक्यता आहे. विकासाचा दर काही प्रमाणात कमी झाला असला तरी त्याला  मंदी म्हणता येणार नाही, असे सांगतानाच विकासाला चालना देण्यासाठी सरकारने अनेक उपाय योजले असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन याची दोन दिवसापूर्वी संसदेत सांगितले होते. 
रिअल इस्टेट आणि गैरबँकिंग वित्तीय संस्थांना आधार देण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या उपायांच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या तिमाही पासून अर्थव्यवस्था सावरेल, असा अंदाज अनेक अर्थविषयक संस्थांनी व्यक्त केला आहे. ग्राहकाकडून वस्तू आणि सेवांची मागणी कमी झाली आहे. खासगी गुंतवणुकीत घट झाली असून निर्यातदेखील मंदावली आहे. याआधी वर्ष २०१२ - १३ च्या मार्च तिमाहीत जीडीपी दर ४. ३ टक्के इतका होता. तेव्हापासूनची जीडीपी दराची नीचांकी पातळी सप्टेंबर तिमाहीत गाठली गेली. निर्मिती क्षेत्र, कृषी क्षेत्राबरोबरच  बांधकाम क्षेत्राची सप्टेंबर महिन्यात खराब कामगिरी झाली. सप्टेंबर तिमाहीत निर्मिती क्षेत्राचा विकास दर गतवर्षीच्या सप्टेंबर ६. ९ टक्क्याच्या तुलनेत उणे १ टक्के इतका राहिला . कृषी क्षेत्राचा विकास दरही ४.९ टक्क्याच्या तुलनेत केवळ २. १ टक्क्यावर आला आहे. बांधकाम क्षेत्राचा विकास दार ८. ५ टक्क्याच्या तुलनेत ३ . ३ टक्के इतका नोंदवण्यात आला असून खान उद्योगाचा विकास दार उणे २. २ टक्क्याच्या तुलनेत ०. १ टक्क्यावर आला आहे. दरम्यान पायाभूत सुविधा क्षेत्राच्या निर्देशांकांतही घट नोंदविली गेली आहे. सप्टेंबर महिन्यातील हा निर्देशांक ५. ८ टक्क्यावर  आला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने