महाविकास आघाडीचे “ ग्रँड “ शक्ती प्रदर्शन


मुंबई: 

सरकार स्थापन करण्यासाठी बहुमत नसतानाही भाजपने चुकीच्या मार्गाने सत्ता मिळवली. राज्यातील जनमताच्या विरोधात हा पक्ष असल्याने या पक्षाला विश्वासदशर्क ठरवण्याच्यादिवशीसत्तेवरू पाय उत्तर करा असे आव्हाहन शिवसेना राष्ट्रवादी  व काँग्रेसच्या नेत्यांनी सोमवारी महाविकासघडीच्या आमदारांना केलं.. ‘ आम्ही१६२
‘  असल्याचे जाहीर करत या आघाडीने हॉटेल ग्रँड हयात मध्ये  आपल्या सर्व आमदारांना एकत्र आंत जोरदार शक्तिप्रदर्शन  केलं , व बहुमताचा आकडा आपल्याकडेच असल्याचे दाखूनन दिले. या सर्व १६२ आमदाराची परेड  म्हणाल तर राज्यभवनावर किंवा म्हणाल तर थेट राष्ट्रपती भवनावरही करण्यास तयार आहोत, असे आव्हानच यावेळी दिले.
आपल्याकडे १६२ आमदारांचे संख्याबळ असल्यामुळे,  उद्याचे राज्यकर्ते तुम्हीच आहेत, असा शब्द महाविकास आघाडीच्या नेताना देताच सर्वानी टाळ्यांचा कडकडाट केला.  यावेळी १६२ आमदाराची उपस्थिती होती. असा दावा शिवसेना, राष्ट्रवादी, व काँग्रेसच्या नेत्यांनी केला. राज्याच्या राजकीय इतिहासामध्ये वेगवेगळ्या विचारांचे तीन पक्ष यापूर्वी एकत्र आले नाहीत. पण सोमवारी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या प्रमुख राजकीय पक्षाच्या एकजुटीने भाजपला आव्हाहणच दिले. गैरमार्गाने सत्तेवर आलेल्या भाजपला ३० नोव्हेंबर रोजीच सत्तेतून पायउतार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा निर्धरही त्यांनी केला.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्य मुद्द्याला हात घातला ते म्हणाले अजित पवार  याना पक्षाने पदावरून काढले आहे. त्यांना व्हीप काढण्याचा कोणताही अधिकार नाही . त्यांचा व्हीप नाकारला तर आपली आमदारकी जाईल अशी काळजी  वाटणाऱ्यानी मनातील भीती दूर करावी या सदंभात मुद्दाम संभ्रम निर्माण केला जात आहे. मात्र विधिमंडळात काम .......  

मुंबई:  हॉटेल हयात येथे १६२ आमदारांसह एकनिष्ठतेची शपथ घेताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,  काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील आदी. विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपला मदत  करणार नाही, अशी शपथ यावेळी सर्व आमदारांना देण्यात आली. 
“आम्ही  १६२”      

मुंबईतील विविध हॉटेलमध्ये मुक्कामाला असलेल्या या तिन्ही पक्षाच्या आमदारांना स्वतंत्र बसेस मधून संध्याकाळी ७ वाजता ह्यात हॉटेल मध्ये आणण्यात आले. हॉटेलच्या हॉलमध्ये भारतीय संविधानाची प्रतिकृती लावण्यात आली होत. आम्ही १६२ आहोत, असे फलकही यावेळी लावण्यात आले .   

थोडे नवीन जरा जुने