नीरव मोदींच्या पाच गाड्यांचा लिलाव

पंजाब  नॅशनल बँकेची हजारो कोटींची फसवणूक करून  परदेशात पळून गेलेल्या हिरे व्यापारी नीरव मोदींच्या ७ आलिशान गाडयांचा मेटल स्क्रॅप टेडिंग कॉर्पोरेशन पुन्हा लिलाव केला. त्यापैकी पाच गाड्यांची विक्री झाली
  या लिलावात विक्री झालेल्या  पाच गद्यामधून २ कोटी ९ लाख रुपयांची रक्कम गोळा झाली आहे. रॉल्झ रॉयसचा १ कोटी ७ लाख रुपयांत लिलाव झाला. तर, पोर्शेची विक्री ६० लाख २५ हजार रुपयांत झाली. लिलाव झालेल्या अन्य गाड्यामध्ये मर्सिडीज  एसयूव्ही , एक टोयोटा इनोव्हा आणि एक होंडा ब्रियोचा समावेश आहे. गेल्या वेळी रोल्स रॉयस घोस्ट आणि एका पोर्शे पॅंनामेरा या गाड्यावर लिलावासाठी अधिकची मूळ किंमत लावण्यात आली होती. मात्र , काही खरेदीदारांना वेळेत रक्कम भरता आली नाही

एमएसटीसीने जाहीर केलेल्या १३ गाड्याच्या लिलावासाठी एकूण १२ खरेदी दार  होते. मात्र, एका मर्सिडीज एसयूव्हीसह ४ गाड्याचे खरेदी दार निश्चित केलेली रक्कम देऊ शकले नाहीत. त्यामुळे या ५ गाडयांचा पुन्हा लिलाव केला . 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने