राज्यातील सर्व महाविद्यालयांना ‘नॅक ‘ करून घराण्याचे आदेश

राज्यातील सर्व महाविद्यालयांना ‘नॅक ‘ करून घराण्याचे  आदेश 
पुणे : राज्यातील सर्व महाविद्यालयांनी चालू शैक्षणिक वर्षात नॅशनल असेसमेंट अँड ऑक्टरीडीटेशन कौंनसी कडून [ नॅक ]  मुल्याकंन कारण घ्यावे. अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण सचिव सौरभ विजय यांनी दिले आहे. मात्र , राज्यातील दहा  तंत्रशिक्षण विभागातील ३ हजार ४२ महाविद्यालयातील केवळ १ हजार २६४ महाविद्यालयांनी नॅक मुल्याकंन करून घेतले आहे. त्यामुळे उर्वरित १ हजार ७७८ महाविद्यालयांना तत्काळ नॅक मुल्याकंनची प्रक्रिया करणी लागणार आहे.

    राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंची परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शनिवारी पार पडली . या वेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी महाविद्यालयाच्या नॅक मूल्यांकनाबाबत चर्चा केली. तसेच चालू शैक्षणिक वर्षात सर्व महाविद्यालयांनी नॅक करून घ्यावे , अशा सूचना दिल्या. उच्च शिक्षणाच्या दर्जात वाढ व्हावी , विध्यार्थाना आवश्यकमहाविद्यालयांचे  सोइ-सुविधा उपलब्ध व्हाव्यात , या उद्देशाने सर्व महाविद्यालयांना नॅक बंधनकारक केले आहे. मात्र, शासकीय महाविद्यालयांसह अनेक अनुदानित व विनानुदानित महाविद्यालयांनी नॅक करून घेतले नसल्याचे माहिती समोर आली आहे. 
नॅक मुल्यांकन केलेल्या राज्यातील शासकीय व अनुदानित महाविद्यालयाची संख्या मोठी आहे. राज्यात एकूण २८ शासकीय महाविद्यापैकी २३ महाविद्यालयाचे नॅक  मुल्याकंन झाले आहे. मात्र मुंबई विभागातील ३, नागपूर व औरंगाबाद , नांदेड आणि सोलापूर या विभागातील प्रत्येकी १ अशा पाच शासकीय महाविद्यालयाचे अद्याप नॅक  मुल्यांकन झालेले नाही. तसेच राज्यातील १ हजार ८३७ विनाअनुदानित महाविद्यालयापैकी केवळ १८१ विनाअनुदानित महाविद्यालयांनी मुल्याकंन करून घेतले आहे. त्यात अमरावती  ओरंगाबाद, नांदेड आणि सोलापूर या विभागातील बोटावर मोजता येतील एवढ्या महाविद्यालयांनी मुल्यांकन केले आहे. 
अनुदानित नॅक  महाविद्यालयाची आकडेवारी 
पुणे विभाग आगाडीवर 
पुणे विभागात एकूण १६७ अनुदानित महाविद्यालये असून, त्यातील १६५ महाविद्यालयांनी मुल्यांकन केले आहे. तर ३०८ विनाअनुदानित महाविद्यालयापैकी ४९ महाविद्यालयांनी नॅक कडून मुल्याकंन केले आहे. विभागातील एकूण ४६७ महाविद्यालये असून त्यातील २१४ महाविद्यालयांनी मुल्याकंनची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 
अमरावती विभागातील १५२ महाविद्यालयापैकी ११८ महाविद्यालयांनी  औरंगाबाद विभागात ११५ पैकी १०२ , जळगाव विभागात ८३ पैकी ८२, कोल्हापुरातील १३३ पैकी १३२ , मुंबई विभागातील ११ पैकी ९२ नागपूर विभागातील १९५ पैकी १५४ , नांदेड विभागातील ९७ पैकी ९३, पनवेल विभागातील ९४ पैकी ९२ , पुणे विभागातील १६८ पैकी १६५ मुल्यांकन केले आहे. सोलापूर विभागातील ४० पैकी ४० महाविद्यालानी मुल्याकंन केले आहे. 

विभागाचे             महाविद्यालयांची नॅक झालेल्या 
  नाव                  संख्या     महाविद्यालयांची संख्या 
अमरावती            २९१         १२६

औरंगाबाद           ३८७       १११

 जळगाव              १५१       ९४

कोल्हापूर             २२४     १५४ 

मुंबई                  २४२     १२८

नागपूर                ५७०     १६९

नांदेड                २६१       ९१ 

पनवेल            ३६३             १३०

पुणे                 ४७६       २१४

सोलापूर              ७७         ४७

                      ३,०४२                       १,२६४
थोडे नवीन जरा जुने