टाइम्सच्या शक्तीशाली व्यक्तींच्या यादीत आकाश अंबानींचा समावेश

 लंडन – भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओचे अध्यक्ष आणि तरुण उद्योगपती आकाश अंबानी यांचा टाइम्सने जगातील १०० शक्तिशाली उभरत्या ताऱ्यांच्या यादीत समावेश केला आहे. टाइम्सच्या या यादीतील ते एकमेव भारतीय तरुण उद्योगपती आहेत.

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे ३० वर्षांचे पुत्र आकाश अंबानी यांची यावर्षीच्या जूनमध्ये जिओचे अध्यक्षपदी निवड झाली. रिलायन्स उद्योग समूहाततील मुकेश अंबानींचे उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवल्याचे मत त्यानंतर उद्योग क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले होते. मुकेश अंबानी रिलायन्स उद्योगाची जबाबदारी हळूहळू पुढच्या पिढीकडे म्हणजे ईशा आणि अनंत अंबानी यांच्याकडेही सोपवण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. रिलायन्स जिओ सुरू करताना त्यात आकाश आणि ईशा अंबानी या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या कंपनीचे ४२.६ कोटी ग्राहक आहेत. टाइम्सने १०० नेक्स्ट यादी जाहीर केली. त्यात सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या नावाचा समावेश केला आहे. या यादीत १०० उगवत्या ताऱ्यांचा समावेश आहे. त्यात आकाश अंबानी यांचा नेता श्रेणीतील यादीत समावेश केला आहे. या यादीत ओन्ली फॅन्स सो
शल मीडियाच्या भारतीय वंशाच्या सीईओ आम्रपाली गुन यांचाही समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने