तरूणांकडून होत होता पूल तोडण्याचा प्रयत्न; गुजरात दुर्घटनेआधीचा Video.

गुजरात  : रविवारी सायंकाळी गुजरातमधील मच्छू नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत १३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटने आधीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरूण पुलाला लाथा मारताना दिसत आहे.



दरम्यान, काल सायंकाळी झालेल्या या दुर्घटनेत आत्तापर्यंत १३२ जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे. तर या घटनेआधीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. काही तरूण पुलावर हुल्लडबाजी करत आहेत. तर काहीजण पुलाला लाथा मारताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

या घटनेत फक्त सर्वसामान्यच नाही तर खासदार मोहनभाई कल्याणजी कुंदरिया यांच्या कुटुंबातील १२ सदस्य या घटनेत मृत्यूमुखी पडले आहेत. तर या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने ४ लाखांची तर केंद्र सरकारने २ लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना राज्य सरकारने ५० हजारांच्या मदतीची घोषणा केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने