'मनसे सरड्यासारखी रंग बदलणारी'! पेडणेकर कडाडल्या

मुंबई: शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबई महानगर पालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर कडाडून टीका केली आहे. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रियांना उधाण आले आहे.



किशोरी पेडणेकर या त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये म्हणाल्या की, मनसेची भूमिका सरड्यासारखी रंग बदलणारी आहे. याचे कारण म्हणजे, सरडा पण लाजेल एवढी भूमिका ते बदलतात, भोंगे वाजवले, पुन्हा भोंगे बंद, लोकांना किती गृहित धरायचं. किती निखालसपणे खोटे बोलायचे. त्यांच्या पक्षाचे नाव वेगळे आणि प्रत्यक्षात कृती वेगळी असे. लोकांच्या मनात आपल्या पक्षाविषयी काय प्रतिमा तयार होते आहे याचाही विचार करावा. असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.लोकांना देखील त्यांच्या पक्षाची इमेज माहिती आहे. लोकांनी आता तुमच्या पक्षाला गृहित धरले आहे. त्यामुळे तुम्ही त्या फेजमधून बाहेर येऊ शकत नाही.आपण किती खोटं बोलतो आहोत अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. यापूर्वी देखील पेडणेकर यांनी परखडपणे मनसेवर आपली भूमिका मांडली आहे. मनसेचे धोरणात्मक निर्णय, त्यांची भूमिका यामुळे तो पक्ष कायम लोकांना गृहित धरतो असे पेडणेकर यांनी म्हटले आहे.

काल अमेय खोपकर यांनी एक ट्विट करुन वादाला तोंड फोडलं होतं. ''ज्या कुणाला फटाक्यांचा त्रास होत असेल त्यांनी बॅगा भरायच्या आणि लगेच मुंबई काय, देश सोडून निघून जायचं. अशा हिंदूद्वेष्ट्या मुसलमानांनी आमच्या देशात रहायची गरजच नाही. आमचा सण आहे, आम्ही फटाके वाजवणारच. आम्ही वर्षानुवर्षे भोंग्यांचा त्रास सहन करतोय ना, मग तुम्ही चार दिवस फटाके सहन करा'' असं ट्विट खोपकर यांनी केले होते.या ट्विटनंतर आरोप-प्रत्योरोप सुरु आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही खोपकरांना टार्गेट केलं होतं. त्याला उत्तर देतांना खोपकर म्हणाले की, मी माझ्या विधानावर ठाम आहे. किशोरी पेडणेकर यांनी अशा विषयांवर बोलू नये. सध्या त्यांचं पक्षातलं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. सुषमा अंधारे यांचं पक्षामध्ये वजन वाढत आहे. त्यामुळे पेडणेकरांना त्रास होतोय. परंतु माझ्यावर जे शिवसेनेचे नेते खालच्या पातळीवर टीका करतील त्यांना घरात घुसून मारेन, असा दम त्यांनी दिला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने