येथील लोक एका पक्षाला दुसऱ्यांदा सत्ता देत नाहीत, यावेळी मात्र...

हिमाचल प्रदेश: निवडणूक आयोगाने कालच (१४ ऑक्टोबर) विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. येत्या २७ ऑक्टोबरला अर्ज भरण्याचा शेवटॉचा दिवस असून ८ डिसेंबरला निकाल स्पष्ट होतील. सध्या हिमाचल प्रदेशात भाजपची सत्ता असून जय राम ठाकूर हे मुख्यमंत्री आहेत.आयोगाच्या माहितीनुसार, हिमाचर प्रदेशात ६८ विधानसभा मतदारसंघांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. यासाठी २५ ऑक्टोबर २०२२ हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटा दिवस असेल. २७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल, तर २९ ऑक्टोबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.


आलटून पालटून मिळते सत्ता

२०१७मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं. या प्रदेशात विधानसभेच्या ६८ जागा आहेत. सध्याच्या विधानसभेत भाजपचं संख्याबळ ४४ इतकं असून काँग्रेसचं २१ सदस्य तर अपक्ष ३ सदस्य आहेत.

हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीचा इतिहास बघता येथील लोक सत्ताधारी पक्षाला दुसऱ्यांदा संधी देत नाहीत. २०१७ मध्ये हिमाचलमध्ये भाजपची सत्ता आली. त्यापूर्वी २०१२मध्ये काँग्रेसने हिमाचलचा गड काबिज केला होता. तेव्हा ६८ पैकी काँग्रेसचे ३६, भाजपचे २६ तर अपक्ष ६ सदस्य विधानसभेमध्ये निवडून गेले होते. विरभद्र सिंग हे त्यावेळी मुख्यमंत्री होते.

२००७मध्ये भाजपची सत्ता

त्यापूर्वी २००७मध्ये हिमाचल प्रदेशच्या विधानसभेत भाजपचं संख्याबळ जास्त होतं. सत्तेविरोधी लाटेवर स्वार होत भाजपने ६८ पैकी ४१ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला २३ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. उरलेल्या चार जागांपेकी बहुजन समाज पार्टीने एक आणि इतरांना तीन जागा मिळाल्या. १९९० नंतर भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी २००७ ते २००२ पर्यंत प्रेमकुमार धुमल हे मुख्यमंत्री राहिले. धुमल यांचा बमसन हा विधानसभा मतदारसंघ आहे.

त्याआधी विधानसभेत काँग्रेसचं वर्चस्व

२००३ ते २००७ या काळात पुन्हा काँग्रेसचे विरभद्र सिंग हे मुख्यमंत्री होते. विरभद्रसिंग यांचा रोहडू हा विधानसभा मतदारसंघ आहे. त्यापूर्वी १९९८ ते २००३ प्रेम कुमार धुमल हे भाजप नेते मुख्यमंत्री राहिले आहेत. त्याहीअगोदर १९९३ ते १९९८ या काळात वीरभद्र सिंग हे मुख्यमंत्री होते. १९० ते १९९२ या काळात भाजपची सत्ता हिमाचल प्रदेशमध्ये होते. शांता कुमार हे मुख्यमंत्री होतं.अशा प्रकारे आलटून पालटून काँग्रेस आणि भाजपची सत्ता हिमाचल प्रदेशवर राहिलेली आहे. त्यामुळे यावेळी काय होणार, असा प्रश्न उपस्थित होतोय. सध्या काँग्रेसचा गड भग्नावस्थेत आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाने मागील दोन वर्षांपासून इथे ताकद लावली आहे. सत्ताधारी भाजप पुन्हा सत्ता काबिज करणार की दुसऱ्या पक्षाला संधी मिळणार, हे येणारा काळच ठरवेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने