रोजगार देण्यात संरक्षण मंत्रालय अव्वल; अमेरिका, चीन पिछाडीवर

दिल्ली : मोठया प्रमाणाता रोजगार देण्याबाबतीत भारताचे संरक्षण मंत्रालय जगात आघाडीवर असून, या बाबतीत अमेरिका आणि चीनही भारतापेक्षा मागे आहेत. जर्मनीस्थित स्टॅटिस्टा इन्फोग्राफिकने हा दावा केला आहे. जर्मनीस्थित स्टॅटिस्टा इन्फोग्राफिक ही एक खाजगी संस्था असून, जगभरातील विविध आकडेवारी तयार करून ती प्रसिद्ध करण्याचे काम करते. स्टॅटिस्टा 2022 च्या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, भारताचे संरक्षण मंत्रालयाने 29.2 लाख जणांना रोजगाराची संधी दिली आहे. या संधीसह भारत जगातील सर्वात मोठा नियोक्ता असल्याचे स्टॅटिस्टाने अहवालात म्हटले आहे. या नोकऱ्यांध्ये लष्करातील तिन्ही विभागांच्या नोकऱ्यांचा समावेश आहे.



रोजगाराच्या बाबतीत अमेरिकेचा संरक्षण विभाग भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या खालोखाल आहे. पेंटागॉनशी संलग्न संस्थांमध्ये 29.1 लाख लोकांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. तर, तिसऱ्या क्रमांकावर चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) आहे. येथे 25 लाख जणांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत.

वॉलमार्टचे 23 आणि अॅमेझॉनचे 1.6 दशलक्ष कर्मचारी

संरक्षण मंत्रालयाच्या रोजगारानंतर खासगी कंपन्यांमधील संधींबाबत स्टॅटिस्टाने त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, वॉलमार्टमध्ये जगातील सर्वाधिक 23 लाख कर्मचारी आहेत. त्याचवेळी Amazon चे 16 लाख कर्मचारी आहेत. या दोन्ही अमेरिकन कंपन्या असून त्यांचे कामकाज जगभर पसरलेले आहे.

लष्करी खर्चाबाबत भारत तिसऱ्या स्थानी

भारताच्या संरक्षण मंत्रालयाबाबत स्टॅटिस्टा प्रकाशित केलेला हा अहवाल आश्चर्यकारक वाटावा असा नाही. कारण लष्करी खर्चाच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2021 मध्ये जागतिक लष्करी खर्च 2113 डॉलर अब्जपर्यंत वाढला आहे.स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (SIPRI) अहवालानुसार, लष्करावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या पाच देशांमध्ये अमेरिका, चीन, भारत, ब्रिटन आणि रशिया यांचा समावेश आहे. या पाच देशांचा मिळून एकूण जागतिक लष्करी खर्चापैकी 62 टक्के वाटा आहे. अमेरिकेने 2021 मध्ये लष्करावर 801 अब्ज डॉलर खर्च केले आहे, तर चीनने 293 अब्ज डॉलर खर्च केले. 76.6 अब्ज डॉलर्सच्या संरक्षण खर्चासह भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने