भारताचा परकीय चलन साठा दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माहितीनुसार (आरबीआय) परकीय चलन (Forex Reserves) दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर आला. आरबीआयने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, परकीय गंगाजळी $4.50 अब्ज डॉलरने घसरून $528.37 अब्ज झाली. 24 जुलै 2020 नंतरचा हा नीचांक आहे.



आरबीआयच्या परकीय चलन मालमत्तेमध्ये (FCA) घट झाल्यामुळे परकीय चलन साठ्यात घट झाली. परकीय चलन मालमत्तेमध्ये (FCA) ने आठवड्यातून $2.8 अब्ज बिलियने घसरले आहे. याच आठवड्यात आरबीआय (RBI) ची सोन्याची होल्डिंग $1.5 अब्ज घसरून $37.45 बिलियन झाली आहे. 7 ऑक्टोबर रोजीच्या आकडेवारीनुसार, भारताच्या परकीय चलन साठ्याला 10 आठवड्यांत थोडासा दिलासा मिळाला होता.या वर्षी फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून भारताच्या परकीय चलन साठ्यात मोठी घट झाली आहे. आरबीआय (RBI) च्या ताज्या आकडेवारीवरून असे दिसून येते की सेंट्रल बँकेने ऑगस्टमध्ये विदेशी मुद्रा बाजारात $4.2 अब्जची निव्वळ विक्री केली आहे.

सप्टेंबरमध्ये, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले होते की, जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता असूनही भारताचा परकीय चलन साठा मजबूत आहे. त्यावेळेस त्यांनी वाढत्या अमेरिकन डॉलर आणि यूएस बॉण्डच्या उच्च उत्पन्नामुळे झालेल्या बदलांमुळे साठ्यातील घसरण झाली आहे.भारताच्या चालू खात्यातील वाढती तूट आणि घसरत्या रुपयाला आधार देण्यासाठी आरबीआयने उचललेली पावले यामुळे भारताच्या परकीय चलन साठ्यात घसरण सुरूच राहील, असे डॉइश बँकेने (Deutsche Bank) यापूर्वी सांगितले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने