लोकशाहीतले खंदे सैनिक; PM मोदींनी वाहिली श्रद्धांजली

 नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांचं आज निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. पोटाच्या आजाराने ते त्रस्त होते. आज सकाळी साडेआठच्या सुमारास अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८२ वर्षांचे होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. काही फोटो शेअर करत त्यांनी यादवांच्या आठवणी जागवल्या आहेत. मुलायम सिंह यादव यांनी उत्तर प्रदेश आणि राष्ट्रीय राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. आणीबाणीच्या काळात ते लोकशाहीच्या लढ्यातले प्रमुख सैनिक होते. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी सशक्त भारतासाठी काम केले. त्यांचे संसदीय कामकाज अभ्यासपूर्ण होते आणि राष्ट्रीय हित पुढे नेण्यावर त्यांनी भर दिला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने