पंतप्रधान पदासाठी ऋषी सुनक यांना 100 हून अधिक खासदारांचा पाठिंबा

 


ब्रिटन: भारतीय वंशाचे ब्रिटिश खासदार ऋषी सुनक यांनी यूकेच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी नामांकनाची किमान मर्यादा ओलांडलीय. सुनक यांना ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी कंझर्व्हेटिव्ह पक्षातील  100 हून अधिक खासदारांनी पाठिंबा दिलाय.नामांकनाची किमान मर्यादा ओलांडलेल्या देशाचे माजी पंतप्रधान लिझ ट्रस  यांच्या राजीनाम्यानंतर या पदावर दावा करणारे ऋषी सुनक हे पहिले आहेत. यापूर्वी ब्रिटनमध्ये झालेल्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत ऋषी सुनक यांना लिझ ट्रस यांच्यासमोर पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. पण, आता त्यांना यूकेच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सामील होण्यासाठी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या किमान 100 खासदारांचा पाठिंबा मिळाला आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतरची ही महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड आहे. ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी सार्वत्रिक निवडणुकांची मागणी केलीय.




पंतप्रधानपदावर बोरिस जॉन्सन यांचाही दावा

यूकेचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सामील होण्याची इच्छा व्यक्त केलीय. पुन्हा एकदा ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. शुक्रवारी हाऊस ऑफ कॉमन्समधील नेते पेनी मॉर्डंट यांनीही पंतप्रधानपदावर दावा केलाय. मॉर्डंट यांनी ट्विट केलं की, 'मला मित्र पक्षांचा पाठिंबा आहे, त्यामुळं एकसंघ पक्ष आणि राष्ट्रहितासाठी मला नेतृत्व हवं आहे.'

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने