उद्योग राज्याबाहेर का जातायत? आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण

मुंबई: राज्यात येणारे मोठे आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प दुसऱ्या राज्यांमध्ये जात आहेत. त्यावरुन राज्यात चांगलाच गदारोळ माजला आहे. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावरुन सरकारवर टीका केली आहे. तसंच त्यांनी हे प्रकल्प राज्याबाहेर जाण्याचं कारणही सांगितलं आहे.आदित्य ठाकरे यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत याविषयी भाष्य केलं आहे. या प्रकल्पांबद्दल बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, "चौथा मोठा प्रकल्प राज्यातून निघून गेला. मी गेले तीन चार महिने तुमच्यासमोर येऊन वाचा फोडतोय. या घटनाबाह्य सरकारमध्ये असलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उद्योगमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही मिहानमध्ये एअरबस आणूच.आम्हीही हा प्रस्ताव मांडलेला पण आता तो निघून गेला".

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, वेदांता बद्दल त्यांना माहित नव्हतं तसं एअरबस बद्दलही माहित नव्हतं. या राज्याचे मंत्री खोटं बोलत आहेत का? आम्ही दिल्लीला जाऊन पंतप्रधानांनी बोलू असं का सांगितलं? करार झाला हे माहित असूनही त्यांनी ते का सांगितलं नाही? खोके सरकारवर कोणत्याही उद्योजकाचा विश्वास नाही, त्यामुळेच उद्योग राज्याबाहेर जातायत".



मुख्यमंत्र्यांवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, "आपले मुख्यमंत्री मंडळ, दहीहंडी, राजकीय भेटी फोडाफोडी हे सोडून काही करत नाही. दुसऱ्या राज्यात जाऊन मुख्यमंत्र्यांनी काही उद्योग आणलेलं नाही. राज्यात हे काय गुंतवणूक आणणार? जसं शिवराजसिंह चौहान, नवीन पटनायक आपल्या राज्यात आले उद्योजकांशी चर्चा केली, आपल्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं?"

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने