रात्रीची वेळ, रुग्णवाहिका अन् वेगाने आलेली कार; वांद्रे-वरळी सी लिंकवरील भीषण अपघात कॅमेऱ्यात कैद, मोदींनीही व्यक्त केला शोक

 मुंबई: मुंबईत वांद्रे-वरळी सी-लिंकवर झालेल्या भीषण अपघातात पाचजणांचा मृत्यू झाला असून, १० जण जखमी झाले आहेत. चार वाहनं आणि रुग्णवाहिकमध्ये धडक होऊन हा भीषण अपघात झाला. जखमींना उपचारासाठी नायर, सैफी, लिलावती ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील दोघांना उपचार करून घरी पाठवण्यात आले असून उर्वरित जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने