अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास आंदोलन; कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना स्वभिमानीचा इशारा

 कोल्हापूर : कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव घेतल्याने कोल्हापूर व सांगली जिल्हा कायम स्वरूपी पाण्याखाली जाण्याची भीती असल्याने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावेळी केली. अन्यथा या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने बोम्मई यांची भेट घेतली. त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षात  कर्नाटकातील अल्लमट्टी धरणाला लागून असलेल्या गावांना तसेच महाराष्ट्रातील पंचगंगा, कृष्णाकाठी असलेल्या गावातील  पूरपरिस्थितीचा मोठा फटका बसून शेतकरी व ग्रामीण भागातील जनतेची अपरिमित नुकसान झाले आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढल्यामुळे लगतच्या भागात परत पाणी पसरण्याची शक्यता असल्याने पुरामुळे नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे.



अलमट्टीमध्ये साठलेल्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी तुमचे सरकार पुढे येत असले तरी या नैसर्गिक घटकांमुळे जास्त पाणी आणि पूर यांच्यावरील तुमच्या नियंत्रणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पुरस्थिती पाहता या धरणाची उंची वाढवू नये. तसे झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू. दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागातील ऊस उत्पादक शेतकरी कर्नाटकच्या सीमाभागात असलेल्या साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करतात. त्यांना प्रतिटन एफआरपीपेक्षा २०० रुपये अधिक द्यावेत, अशी मागणी प्रा. डॉ. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्ड्वान्नावर, बंडू पाटील, तानाजी वठारे आदींनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने