कर्नाटकात दीडशे जागांवर फुलेल ‘कमळ’ राज्य निरीक्षक अरुण सिंग यांचा दावा.

बेळगाव : देशात विविध राज्यात जनतेनी भाजपला कौल दिला आहे. कर्नाटकातही तो ‘ट्रेंड’ कायम राहील आणि १५० पेक्षा अधिक जागांवर कमळ फुलेल आणि पक्षाला एकहाती सत्ता मिळेल, असा दावा भाजपचे कर्नाटक राज्य निरीक्षक अरुण सिंग यांनी आज (ता.१६) शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत केला.कॉंग्रेसमध्ये दुफळी आहे. केपीपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि विधानसभा विरोधीपक्ष नेते सिध्दरामय्या यांच्या मतभिन्नता आहे. यामुळे विकासाच्या वाटेवरती नेण्यासाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात बसवराज बोम्मई यांचे नेतृत्व हवे. त्यामुळे भाजप परत राज्यात विजयी होईल व कॉंग्रेस पराभूत होईल, असा दावा सिंग यांनी केला.



अरुण सिंग म्हणाले',‘‘बेळगाव जिल्ह्यात नेत्यांसह आमदारांमध्ये मतभेद असतील. मात्र, मनभेद नाही. प्रत्येकाला विचार मांडण्याचा अधिकार असावा. तेव्हा विचारांना स्वातंत्र मिळते. पण मनभेद नसावे. पंचमसाली समाजाला आरक्षण मिळावे, या उद्देशाने अलिकडे मेळावा झाला. मात्र, पक्ष या गोष्टीवर काम करत आहे. अलिकडे एससी व एसटी समुदायच्या आरक्षणात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार बसवराज यत्नाळ सरकारच्या विविध विषयावर सतत टीका करत असल्याचा विषय गंभीरपणे घेतला आहे. त्यांना नोटीस बजावली आहे. योग्यवेळी निर्णय घेऊ. पहिल्यांदा कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनी इतिहासाचा अभ्यास करावा व यानंतर देशात भारत जोडो यात्रा काढावी. देशाची फाळणी, नक्षलवाद, विभागणी कॉंग्रेसमुळे घडली. यामुळे राहूल गांधी यांनी इतिहासाची पाने चाळावीत आणि त्यानंतर भारत जोडो यात्रा काढावी, असा आरोप केला.

विजयी ट्रॅकवर भाजप

विधानसभा निवडणुकीसाठी संकल्प सभा आयोजिल्या जात आहेत. व्यापक प्रतिसाद मिळत आहे. गोवा, उत्तराखंड, मनीपूर आणि उत्तर प्रदेशमध्ये पक्षाला सत्ता मिळाली आहे. आता हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये सत्ता मिळवू. त्यासोबत कर्नाटकातही पक्षाला सत्ता मिळेल. कॉंग्रेस पराभवाच्या ट्रॅकवर असून, भाजप विजयाच्या ट्रॅकवर आहे, अशी माहिती अरुण सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

रमेश जारकीहोळींशी गोपनीय चर्चा

आमदार रमेश जारकीहोळी यांच्याशी गोपनीय चर्चा कर्नाटक राज्याचे निरीक्षक अरुणसिंग यांनी आज केली. श्री सिंग यांच्याकडे त्याची विचारणा केल्यानंतर बोलणे टाळले. राज्यात लवकर मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती दिली. आगामी विधानसभेसाठी जारकीहोळी यांना सक्रिय करून घेण्यात येईल, अशी माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने