संजय राऊतांपाठोपाठ अनिल देशमुखांची दिवाळीही तुरुंगात; सीबीआय कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

मुंबई:  कथित १०० कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत. त्यांना काही दिवसांपूर्वीच ‘ईडी’च्या गुन्ह्यांमध्ये जामीन मिळाला होता. मात्र, सीबीआयकडून त्यांची चौकशी सुरू होती. मात्र, आज सीबीआय कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्यांची यंदाची दिवाळीही तुरुंगातच जाणार आहे.



देशमुख यांच्यावरील गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. देशाच्या अर्थ व्यवस्थेवर परिणाम करणारा आहे. देशमुख यांना कारागृहात योग्य ते वैद्यकीय उपचार मिळत आहेत. शिवाय प्रकरणातील माफीचा साक्षीदार झालेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या जबाबाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांचा जबाब महत्त्वाचा आहे, असे विशेष सीबीआय न्यायालयाने देशमुख यांना जामीन नाकारताना नमूद केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने