यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय”; लग्नाच्या रिसेप्शनमध्ये माधुरीचे पती डॉक्टर नेनेंनी जेव्हा बिग बीं ना पाहिलं.

मुंबई :  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अनेक जुने किस्से व्हायरल होत आहेत. असाच एक किस्सा अभिनेत्री माधुरी दिक्षीतच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये घडला होता. माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने यांचा चित्रपटसृष्टीशी काहीच संबंध नाही, शिवाय ते परदेशात राहायचे, त्यामुळे बॉलिवूड कलाकारांविषयी त्यांना फार माहिती नव्हती. 



माधुरी आणि डॉ. नेने यांच्या रिसेप्शनला अमिताभ बच्चन यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी डॉ. नेनेंनी बिग बींना पाहताच “यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय” अशी प्रतिक्रिया दिली होती.माधुरीने ‘Rendezvous with Simi Garewal’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी माधुरीने ही गोष्ट सांगितली होती. “मी आणि डॉक्टर नेनेंच्या आईने मिळून त्यांना माझे काही चित्रपट दाखवण्याचा प्रयत्न केला होता. ते चित्रपट पाहताना डॉक्टर नेने म्हणायचे, आपण काही दुसरं काही करू शकत नाही का, चल बाहेर जाऊया आणि काही करूया”, असे माधुरीने सांगितलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने