कोल्हापूरातील कोंबडीनं दिलं देशातील सर्वात मोठं अंडं

कोल्हापूर:  सोशल मीडियावर अनेक अजब गजब गोष्टी व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणाऱ्या असतात. जर कोल्हापूरबाबत बोलायल गेलं की येथील सगळ्याच गोष्टी हटके असतात. मात्र सध्या कोल्हापूरची एक कोंबडी चर्चेचा विषय ठरली. कारण या कोंबडीने सर्वात मोठं अंडं दिलयं. हो, हे खरंय. सध्या या अंड्याचे फोटो सगळीकडे व्हायरल होतंय.



ही कोंबडी कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील तळसंदे गावातील आहे. येथील दिलीप चव्हाण यांच्या पोल्ट्रीमध्ये हे अंडं मिळालंय. विशेष म्हणजे हे अंडं केवळ कोल्हापूर किंवा महाराष्ट्रातील नाही तर चक्क देशातील सर्वात मोठं अडं आहे, असा दावा केला जात आहे.

या अंड्याचं वजन ऐकाल तर तुम्हाला धक्का बसेल कारण अंडं 210 ग्रॅम इतकं आहे. सामान्यपणे कोंबडीच्या अंड्याचं वजन 70-75 ग्रॅमपर्यंत असतं. त्यामुळे हे अंडं आता सर्वांचेच लक्ष वेधत आहे. कोल्हापूरातील या अंड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी या कोंबडीवर आणि अंड्यावर वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने