राजकारणातच नव्हे तर चित्रपटसृष्टीने देखील घेतली होती दखल...

मुंबई : समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यांनी वयाच्या 82 व्या वर्षी सोमवारी सकाळी मेदांता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्याने केवळ राजकीय वर्तुळातच नाही तर सर्वच क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या कार्याची दखल राजकारणातच नव्हे तर चित्रपटसृष्टीतही घेतली होती. मुलायम सिंह यादव यांच्या आयुष्यावर बायोपिक तयार करण्यात आला होती. 'मैं मुलायम सिंग यादव' असं या चित्रपटाचं नाव होत.



या चित्रपटाचे दिग्दर्शन सुवेन्दू घोष यांनी केले तर अमित सेठी यांनी मुलायम सिंह यादव यांची भूमिका साकारली होती. अभिनेता मिथुन चक्रवर्तीचा मुलगा मिमोह मुलायम यांचे भाऊ शिवपाल सिंह यादव यांच्या भूमिकेत होता. प्रेरणा सिंह यांना मुलायम सिंह यादव यांच्या पत्नीची भूमिका केली होती. प्रकाश बलबेटो यांनी राम मनोहर लोहिया यांची भूमिका साकारली असून गोविंद नामदेव चौधरी यांनी चरण सिंग यांची भूमिकेत होते.झरीना वहाब यांनी मुलायम यांच्या आईची आणि अनुपम श्याम यांनी त्यांच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. 'हा एका शेतकऱ्याच्या मुलाचा प्रेरणादायी प्रवास आहे जो एका राज्याचा सर्वात मोठा नेता बनतो' असा आशय होता.

नथुराम, राम मनोहर लोहिया आणि चौधरी चरणसिंग यांनी मुलायमसिंग यादव यांच्या राजकीय कर्तृत्वाला कसा आकार दिला याचाही उल्लेख या चित्रपटात आहे. इतकंच नाही तर मुलायम सिंह यांच्या मुख्यमंत्री होण्यापर्यंतच्या प्रवासात त्यांची पहिली पत्नी मालती देवी यांनी दिलेल्या योगदानाचाही उल्लेख या चित्रपटात करण्यात आला. मात्र, 'मैं मुलायम सिंह यादव'मध्ये माजी मुख्यमंत्र्यांची दुसरी पत्नी साधना यांचा उल्लेख नसल्याने अनेक प्रश्नही उपस्थित झाले होते. हा चित्रपट सुरुवातीला १४ ऑगस्ट २०२० रोजी प्रदर्शित होणार होता परंतु २ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आणि कोविड-१९ महामारीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन आणखी लांबविले गेले. शेवटी २९ जानेवारी २०२१ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने