विश्लेषण : रणबीर कपूरने बाळासाठी घेतलेल्या पॅटर्निटी लीव्हचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या कायदा आणि तरतुदी

मुंबई :  बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच आई-बाबा होणार आहेत, यामुळे ते दोघेही सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच आलियाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. गेल्या काही दिवसांपासून रणबीर आणि आलिया हे दोघेही ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशनमध्ये तसेच इतर प्रोजेक्टमध्ये व्यग्र असल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता पुढील काही महिने रणबीर कपूर या सर्व प्रोजेक्टमधून ब्रेक घेणार असल्याचं बोललं जात आहे. रणबीर कपूर हा लवकरच पॅटर्निटी लीव्ह घेणार आहे. या काळात तो आलियाबरोबर वेळ घालवणार आहे. त्यामुळेच त्याने कोणताही नवीन चित्रपट न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

रणबीर कपूरच्या या निर्णयानंतर पुन्हा एकदा पॅटर्निटी लीव्ह हा प्रकार चर्चेत आला आहे. यापूर्वी क्रिकेटपटू विराट कोहली, सैफ अली खान, रितेश देशमुख, शाहिद कपूर, मार्क झुकरबर्ग, टेनिसपटू सेरेना विलियम्सचे पती ओहनियान यांनीही पॅटर्निटी लीव्ह घेतली आहे. पण पॅटर्निटी लीव्ह हा प्रकार नेमका असतो काय? यात नेमक्या काय तरतुदी असतात? असे अनेक प्रश्न सध्या अनेकांच्या मनात उपस्थित झाले आहे. चला तर हा कायदा नेमका काय? याबद्दल जाणून घेऊया.गरोदरपणात प्रत्येक स्त्रीला ती काम करत असलेल्या कार्यालयातून मॅटर्निटी लीव्ह ही मिळतेच. ती सहा महिन्यांची असते. या काळात तिला काही त्रास, दगदग होऊ नये यासाठी ही रजा दिली जाते. विशेष म्हणजे ही रजा भरपगारी असते, त्यामुळे आर्थिकरित्याही मदत होते. पण पॅटर्निटी लीव्ह ही संकल्पना आपल्याकडे तशी बघायला गेलं तर फार नवीन आहे.



पॅटर्निटी लीव्ह ही पॅटर्नल लीव्ह, पितृत्व रजा किंवा पालकत्व रजा अशा विविध नावांनी ओळखली जाते. पॅटर्नल लीव्ह ही वडिलांना मुलांच्या जन्मानंतर किंवा एखादे मूल दत्तक घेतल्यावर त्याला दिली जाते. त्याचा तो अधिकार असतो. नवजात मुलाची काळजी घेण्यासाठी कामावर असलेल्या कर्मचाऱ्याला सुट्टी देणे हे बंधनकारक आहे, असे कर्मचारी कायद्यात नमूद करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने