शरद पवारांची तब्येत बिघडली; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची तब्येत ठीक नसल्याने ते उपचार घेत असल्याचं राष्ट्रवादीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. पुढचे तीन दिवस ते याच रुग्णालयात उपचार घेणार आहेत.राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, ब्रीच कँडी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्यांना डिस्चार्ज मिळेल."



त्यांचे पुढचे कार्यक्रम नियोजनाप्रमाणे होतील, असंही निवेदनात म्हटलं आहे. ३ नोव्हेंबर रोजी ते शिर्डी येथे येणार असून पक्षाच्या ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दोन दिवसीय शिबिरासाठी उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करू नये, असं आवाहनही या निवेदनाद्वारे करण्यात आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने