'सुषमा अंधारे निष्ठा शिकवत असतील तर दुर्दैव, उद्धव ठाकरेंबरोबर आता कोणीही राहिलं नाही'

 सातारा : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरें आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही गटाचा दसरा मेळावा . दणक्यात पार पडला. शिवाजी पार्क आणि बीकेसी या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आलं.उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरून केलेल्या टीका, आरोपांना एकनाथ शिंदेंनी. बीकेसीवरून प्रत्युत्तर दिलं. मात्र, या सगळ्यात शिवतीर्थावरील ठाकरेंच्या मेळाव्यात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी . चांगलंच मैदान गाजवलं. अंधारेंच्या टीकेनंतर शिंदे गटातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अंधारेच्या या टीकेला शिंदे गटाचे नेते .शंभूराज देसाईंनी .यांनी प्रत्युत्तर दिलंय.

सुषमा अंधारे या एक महिन्यापूर्वी शिवसेनेत आल्या आणि उपनेत्या झाल्या. आता त्या आमच्यासारख्या निष्ठावान शिवसैनिकांना निष्ठा शिकवत असतील तर यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही. उद्धव ठाकरेंबरोबर आता कोणीही राहिलेलं नाही. त्यामुळं आता जो पक्षात येईल, त्याला पद मिळत आहे, जो येईल त्याला थेट मातोश्रीवर प्रवेश मिळतो आहे, असं प्रत्युत्तर देसाईंनी दिलं.



 सुषमा अंधारेंनी वाटेल तसा प्रचार करावा. मात्र, लोकांना जो योग्य वाटेल त्यांनाचा पाठिंबा मिळेल, असा घणाघातही त्यांनी अंधारेंवर केला. दरम्यान, शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली होती. शिंदे गटातील नेत्यांना हिंदूत्वाचे काहीही सोयरसुतक नसून त्यांना शिवसेना कार्यकर्त्यांची काळजी नाही, असं त्या म्हणाल्या होत्या. या टीकेला शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिलंय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने