हे खूप चुकीचं झालंय”, निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांचा आक्रोश.

मुंबई : भारतीय जनता पार्टीनं अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपाने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा दिलासा आहे.



भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांनी पक्षादेश मान्य केला आहे. मात्र, त्यांचे कार्यकर्ते खूपच नाराज झाले आहेत. “हे खूप चुकीच झालं आहे” अशा संतप्त भावना मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्याकडून व्यक्त केल्या आहेत. भावना व्यक्त करतानाचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यामध्ये मुरजी पटेल यांचे कार्यकर्ते रडताना दिसत आहेत.

खरं तर, अंधेरी पोटनिवडणुकीवरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध भाजपा असा संघर्ष सुरू होता. असं असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिलं. तसेच भाजपानं अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करावी, अशी विनंती केली. या पत्रानंतर राज्यात वेगवान घडामोडी घडल्या. अखेर ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने