अमित शहांच्या घरी मध्यरात्रीची 'ती' बैठक अन् गांगुलीचा BCCI मधून पत्ता कट.

नवी दिल्ली : बीसीसीआयचा मावळता अध्यक्ष सौरभ गांगुली अजून एका टर्मसाठी इच्छुक होता. मात्र बीसीसीआयमधील किंग मेकर्सनी त्याचे पंख छाटले अशा आशयाच्या बातम्या सध्या माध्यमात रोज झळकत आहेत. आता या बीसीसीआय अध्यक्षपदाच्या नाट्यातील हा किंग मेकर कोण हे समोर येऊ लागली आहे. सौरभ गागुलीचे पंख छाटायचे हे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवास्थानावर ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही बैठक 6 ऑक्टोबरला मध्यरात्री 6 - A कृष्ण मेनन मार्गावरील अमित शहांच्या अधिकृत निवसस्थानावर झाली.

मध्यंतरी सौरभ गांगुलीला बीसीसीआय अध्यक्षपदाची दुसरी टर्म द्यायची नाही हे एका बड्या केंद्रीय मंत्र्याच्या घरात झालेल्या बैठकीत ठरल्याच्या बातम्या येत होत्या. आता हे बडे केंद्रीय मंत्री दुसरे तिसरे कोणी नसून बीसीसीआय सचिव जय शहा यांचे वडील आणि गृहमंत्री अमित शहा आहेत अशा माहिती सूत्रांकडून मिळत आहे.अमित शहा हे बीसीसीआयमध्ये कोणतेही पद भुषवत नाहीयेत. मात्र त्यांचा मुलगा जय शहा हा बीसीसीआयचा सचिव आहे. दरम्यान, अमित शहांच्या घरी मध्यरात्री झालेल्या बैठकीत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी सौरभ गांगुली अध्यक्षपदावर असताना पदाच्या गरिमेला ठेच पोहचेल असे वर्तन केल्याचा आरोप केला. 



त्यामुळेच त्यांनी गांगुलीला दुसरी टर्म देण्यात विरोध केला. एन. श्रीनिवासन यांच्या या मागणीला दुजोरा देण्यात इतर बीसीसीआय पदाधिकाऱ्यांना थोडा देखील विलंब लावला नाही. त्यामुळे सौरभ गांगुलीचा पत्ता कट झाला.याच बौठकीत जय शहा यांना सचिव पदाची दुसरी टर्म देण्याचा निर्णय देखील झाला. याचबरोबर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा भाऊ अरूण धुमल यांना आयपीएल चेअरमनपद देण्याचा देखील निर्णय झाला. विशेष म्हणजे भाजपचे नेते राजकीय व्यासपीठावर घराणेशाहीचा जोरदार विरोध करत असतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने