अमेरिकी महिलेने भारतीय मेडिकल कॉलेजला दान केली तब्बल 20 कोटींची संपत्ती

तेलंगणा  : अमेरिकी मुळ असलेल्या महिला डॉक्टरने आपल्या जीवनभराची जमा पुंजी मुलांच्या आणि महिलांच्या उपचारांसाठी दान केली. डॉ. उमा देवी गाविनी असे त्यांचे नाव असून त्यांनी गुंटूर सरकारी जनरल हॉस्पिटलमधे महिला आणि बाल संगोपन केंद्र बनवण्यासाठी २० कोटी रुपये दान दिले.



तेलंगणा टुडे वृत्तपत्र च्या अहवालानुसार, डॉ. उमा यांनी गुंटूर मेडिकल कॉलेज मधून १९६५ साली MBBS पुर्ण केले. ४० वर्षांपूर्वी त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या.त्या कुचीपूडी इथल्या आहेत. त्यांचे वडील म्हणजेच डॉ. वेंकटेश्वर राव हे देखील डॉक्टर होते. अमेरिकेत त्या एक नामांकित इम्युनोलॉजिस्ट आणि ऍलर्जी विशेषज्ञ म्हणून काम करत आहेत.डॉ. उमा चे पती डॉ कानुरी रामचंद्र देखील एक डॉक्टर होते. तीन वर्षांपूर्वीच त्यांचे निधन झाले. या दाम्पत्याचे एकही अपत्य नाही. मागच्या शुक्रवारी डॉ. उमा ने आपल्या जीवनभराची पुंजी दान भारतीय रूग्णालयाला दान केली. त्यांच्या दिलेल्या पुंजीने गुंटूर मध्ये सरकारी हॉस्पिटल मध्ये एक महिला आणि बाल संगोपन केंद्र उभारले जाणार आहे. आंध्र प्रदेश सरकारने या कार्यासाठी हॉस्पिटलला ३५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तेच गुंटूर मेडिकल कॉलेज एल्युमिनी असोसिएशन (GMCANA), नॉर्थ अमेरिका ने ३० कोटी रुपये देण्याची घोषणा केली, त्यामधले २० कोटी डॉ उमा यांनी दान केले आहे.

डॉ. उमा यांची दानशूरता बघत GMCANA मधील अनेक सदस्यांनी दान देण्याचा निर्णय घेतला. GMCANA ने गुंटूर गव्हर्नमेंट जनरल हॉस्पिटल मध्ये ६०० बेड असलेले सुपरस्पैशिएलिटी मदर अँड चाइल्ड केयर हॉस्पिटल बनवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गुंटूर मेडिकल कॉलेज मधील माजी विद्यार्थ्यांनी या हॉस्पिटल ची जवाबदारी घेतली आहे. लोकांनी मदर अँड चाइल्ड केयर यूनिट चे नाव डॉ. उमा यांचे दिवंगत पती डॉ. रामाचंद्र राव यांच्या नावावर ठेवणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने