पॉस मशिन बंद करा; रेशन दुकानदार मागणी

कोल्हापूर - रेशन दुकानदारांकडे असलेल्या ई-पॉझ मशिन मध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे ऑफलाईन धान्य वाटप करण्याची परवानगी मिळावी, या मागणीचे निवेदन आज निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रेय कवितके यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. कॉम्रेड चंद्रकात यादव आणि जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व करून ई-पॉझ मशिन मध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याचे सांगितले. तसेच यामुळे ग्राहकांना वेळेवर धान्य देण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. स्क्रिनवर केवळ ‘प्रतिक्षा करे’ असाच संदेश दिला जात असल्याचे सांगण्यात आले.



यामुळे वितरण होत नाही. तसेच स्थानिक पातळीवरील राजकीय पक्षांचे पदाधिकारी नियमित मालाची ‘ऑफ लाईन’ वाटप करण्याची मागणी करीत आहेत.मात्र जोपर्यंत पुरवठा अधिकारी लेखी आदेश देत नाहीत तोपर्यत हे करणे शक्य नाही. त्यामुळे ई-पॉझ मशिन बंद करून ऑफलाईन धान्याचे वितरण करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात गजानन हवालदार,सुनील दावणे, सुरेश पाटील, पांडुरंग सुभेदार, संजय चौगले, अमोल शेंडगे, अशोक सोलापूर, राजेश मंडलीक, सचिन चव्हाण, प्रवीण पाटील आदींचा समवेश होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने