दिवाळीचं उटणं आणि मशाल; चिन्हाच्या प्रचारासाठी पक्षाने लढवली शक्कल.

मुंबई :  निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांना वेगळी नावं आणि चिन्हं दिली आहे. त्यानंतर आता दोन्ही गटांकडून या चिन्हांचा जोरदार प्रचार करणं सुरू आहे. आगामी अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या चिन्हाच्या प्रचाराची एक अनोखी शक्कल ठाकरे गटाने लढवली आहे.



शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळालं आहे. कमी वेळात हे चिन्ह जनतेपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान समोर आहे. यासाठी ठाकरे गटाने मशाल हे चिन्ह असलेली उटण्याची पाकीटं तयार केली आहेत. दिवाळीच्या निमित्ताने ही पाकिटं वाटून घराघरात मशाल हे चिन्ह पोहोचवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने