मुंबई, गुजरात नाही केवळ 'हिमाचल प्रदेश'ची विधानसभा निवडणूक जाहीर.

 नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंबई महानगर पालिका, गुजरात विधानसभा आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुक जाहीर होण्याची आशा होती. पण आयोगानं केवळ हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याची घोषणा केली.



आयोगाच्या माहितीनुसार, हिमाचर प्रदेशात ६८ विधानसभा मतदारसंघांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. यासाठी २५ ऑक्टोबर २०२२ हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटा दिवस असेल. २७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल, तर २९ ऑक्टोबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने