आगामी निवडणुकीत मनसेचा एकला चलो रे चा नारा, बैठकीत निर्णय?

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या आधी मनसे आणि भाजप यांची युती होणार असल्याची चर्चा राजकारणात रंगू लागली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या वारंवार होणाऱ्या भेटी या युतीची उदाहरणे होती. मात्र या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण नुकतीच मनसेची एक बैठक पार पडली आहे.

आगामी निवडणुकांबाबत राज ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेतला आहे.मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या आज रंगशारदा येथे बैठक पार पडली. या झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी, निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी सज्ज व्हा आणि कामाल लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत.


बैठकीत नेमकं काय घडलं?

राज ठाकरेंनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आपले मत व्यक्त केले असल्याचे समजते. राज्यातील सध्याच्या राजकारणाला जनता वैतागली आहे. अनेक लोकांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पाहिलेला देखील नाही. सत्ता आली तर मी तुम्हालाच सत्तेवर बसवेन, मी सत्तेत बसणार नाही, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला आहे.

तसेच मी तुम्हाला सत्तेत बसवणार, असे आश्वासन राज ठाकरे यांनी यावेळी मनसैनिकांना दिले. सध्या जनतेमध्ये मनसेबाबत सकारात्मक वातावरण आहे. येत्या दिवाळीमध्ये लोकांमध्ये मिसळा, मनसेचा प्रचार करा, अशी सूचनाही राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिली. तसेच तुम्ही काम करा विजयापर्यंत नेण्याची जबाबदारी माझी, असं आश्वासनही राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने