Fiat ने 50000 मुलींना लिहिलं लव्ह लेटर; 'या' कामासाठी बोलावल अन्...

मुंबई वाहन उत्पादक कंपनी फियाट त्यांच्या स्टायलिश गाड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, यावेळी कंपनी एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. या गोष्टीची सर्वदूर चर्चा आहे. आता तुम्ही विचार करत असाल की, फियाटनं असं नेमकं केलं तरी काय? ज्यामुळे अनेक मुली नाराज झाल्या आहेत.फियाट कंपनीने एक मार्केटिंग स्टॅटेजी आखली होती. ज्या अंतर्गत 50,000 हून अधिक मुली आणि महिलांना लव्ह लेटर लिहिण्यात आली होती. ही पत्रे पाठवताना नावं झाकण्यात आले होते. ज्या मुलींना ही प्रेमपत्रे मिळाली त्यानंतर अनेक स्पॅनिश मुली आणि महिलांनी स्वतःला घरात कोंडून घेतले होते. यानंतर कंपनीला मोठ्या त्रासाला समोरे जावे लागले होते. ही घटना 1994 ची आहे.



फियाटने एक नव्हे तर दोन पत्रे लिहिली

१९९४ च्या काळात फियाटला बाजारात वर्चस्व गाजवायचे होते आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचे होते. यासाठी कंपनीने वेगवेगळ्या प्रकारची मार्केटिंग स्ट्रॅटेजी तयार केली होती. मात्र, कंपनीसाठी ही योग्य ठरली नाही.

या मार्केटिंग स्टॅटेजी अंतर्गत एक नव्हे तर, दोन पत्रे पाठवली होती. या पत्रामध्ये मुली आणि महिलांना त्यांचे नाव सांगून कार पाहण्याचे आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, हे निमंत्रण पत्र मिळाल्यानंतर अनेक महिलांनी पोलीस ठाणे गाठले होते.

कंपनीला मागावी लागली माफी अन् भरावा लागला दंड

कंपनीकडून अशा पद्धतीने लव्ह लेटर पाठवण्यात आल्यानंतर अनेक महिला आणि मुलींनी घाबरून थेट पोलीस ठाणे गाठले होते. त्यानंतर पोलिसांनी या सर्व प्रकरणाची चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. तर, दुसरीकडे काही मुलींनी आणि महिलांनी कंपनीवर खटलेही दाखल केले होते. या सर्व प्रकारावर कंपनीने माफी मागितली तसेच दंडही भरला.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने