मोहनलालच्या ‘मॉन्स्टर’ चित्रपटाला मोठा फटका, आखाती देशांमध्ये प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी

मुंबई : मल्याळम सुपरस्टार मोहनलालचा चाहतावर्ग खूपच मोठा आहे. तो त्याच्या चित्रपटांसाठी नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असतात. आता त्याचा ‘मॉन्स्टर’ हा चित्रपट २१ ऑक्टोबरला जगभरात रिलीज होणार आहे, पण त्याआधीच निर्मात्यांना मोठा झटका बसला आहे. कारण काही देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.



मोहनलालने ‘मॉन्स्टर’ या थ्रिलर चित्रपटात लकी सिंगची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट २१ ऑक्टोबर रोजी जगभरातील लाखो स्क्रीन्सवर प्रदर्शित होत आहे. पण अशातच हा चित्रपट आखाती देशांमध्ये प्रदर्शित होऊ शकणार नाही, कारण त्यावर बंदी घालण्यात आली आहे, असे सांगण्यात येत आहे.राक, इराण, सौदी अरेबिया, कुवेत, कतार, UAE इत्यादींना अरबी देश म्हणजेच आखाती देश म्हणतात. या सगळ्या देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. चित्रपटातील LGBTQ शी संबंधित कंटेंटमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. मात्र, निर्मात्यांकडून अद्याप कोणतेही विधान आलेले नाही.

मॉन्स्टर’ या चित्रपटात मोहनलालने साकारलेल्या लकी सिंगच्या व्यक्तिरेखेला अनेक छटा आहेत. या चित्रपटाचे लेखन उदय कृष्ण यांनी केले आहे तर याचे दिग्दर्शन वैशाख यांनी केले आहे. मोहनलाल व्यतिरिक्त या चित्रपटात लक्ष्मी मंचू, सिद्दीकी, लीना, हनी रोज, सुदैव नायर, केबी गणेश कुमार आणि जॉनी अँटोनी सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने