आतापासून सीमावर्ती भागात असलेले प्रत्येक गाव भारताचे पहिले गाव मानले जाईल – पंतप्रधान मोदी

उत्तराखंड :पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(शुक्रवार) उत्तराखंडमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज श्री बद्रीनाथ आणि श्री केदारनाथ मंदिराना भेट देऊन दर्शन घेतले. याशिवाय मोदींनी बद्रीनाथ येथील माना गावात रस्ता आणि रोपवे प्रकल्पांची पायाभरणीही केली. त्यानंतर जनतेला संबोधत करताना मोदी म्हणाले की, आज बाबा केदारनाथ आणि बद्रीनाथ विशाल यांचे दर्शन घेतल्यानंतर मन प्रसन्न झाले, जीवन धन्य झाले. तर, आतापासून सीमावर्ती भागात असलेले प्रत्येक गाव भारताचे पहिले गाव मानले जाईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत



पंतप्रधान मोदी म्हणाले, “माना गाव हे भारताचे शेवटचे गाव म्हणून ओळखले जाते. परंतु माझ्यासाठी सीमेवर वसलेलं प्रत्येक गाव देशाचं पहिलं गाव आहे. आतापासून सीमावर्ती भागात असलेले प्रत्येक गाव भारताचे पहिले गाव मानले जाईल. सीमेवर राहणारे तुमच्यासारखे सर्व सहकारी हे देशाचे सशक्त पहारेकरी आहेत. २१ शतकातील विकसीत भारताच्या निर्माणाचे दोन प्रमुख स्तंभ आहेत. पहिला आपली परंपरेवर गर्व आणि दुसरा म्हणजे विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न.”माना गावात पंतप्रधान मोदी म्हणाले की, “पहिल्य ज्या भागांकडे देशाच्या सीमेचा शेवट म्हणून दुर्लक्ष केले जात होते, आम्ही तिथूनच समृद्धीचा प्रारंभ समजून काम सुरू केले आहे. या अगोदर देशाचे सर्वात शेवटचे गाव म्हणून ज्याची उपेक्षा केली जात होती, आम्ही तिथल्या लोकांच्या अपेक्षांवर लक्ष केंद्रित केले. अयोध्येत भव्य राम मंदिर तयार होत आहे, गुजरातमधील पावागढमध्ये देवी कालिकाच्या मंदिरापासून विन्ध्याचल देवीच्या कॉरिडोरपर्यंत भारत आपल्या सांस्कृतिक उन्नतीसाठी हाक देत आहे.”

गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्तीचे आव्हान –

पंतप्रधान मोदींनी म्हटले की, “देशाच्या स्वातंत्र्याचे ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मी लाल किल्यावरून एक आव्हान केले, ते आव्हान गुलामगिरीच्या मानसिकतेतून पूर्णपणे मुक्तीचे होते. कारण, स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही आपल्या देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेने असे काही जखडले आहे की विकासाचे काही कामही काहीजणांना गुन्हा वाटतो. आपल्या संस्कृतिशी निगडीत परदेशातील ठिकाणांची हे लोक प्रशंसा करताना थकत नव्हते, परंतु भारतात अशाप्रकारच्या कामाला तुच्छतेने पाहिले जात होते.”

गरिबांचे दु:ख समजणारे सरकार –

पंतप्रधान म्हणाले आधुनिक कनेक्टिव्हिटी राष्ट्राच्या रक्षणाचीही हमी असते. यासाठी मागील आठ वर्षांपासून आम्ही या दिशेने एक पाठोपाठ एक पावलं टाकत आहोत. भारतमाला योजनेअंतर्गत देशाच्या सीमावर्ती भागांना उत्तम आणि रुंद महामार्गांनी जोडले जात आहे. तर सागरमालाद्वारे आपल्या भारताच्या समुद्रकिनाऱ्यांची जोडणी मजबूत केली जात आहे. एक संवेदनशील सरकार, गरिबांचे दु:ख समजून घेणारे सरकार आज देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक अनुभवत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने