“भीमराया…”, लंडनमधील आंबेडकरांच्या निवासस्थानाचा फोटो पोस्ट करत गौरव मोरेने शेअर केली खास पोस्ट

लंडन : अभिनेता गौरव मोरे छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून घराघरात पोहोचला. फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख असलेला गौरव त्याच्या विनोद बुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवतो. अभिनय कौशल्याच्या जोरावर त्याने मराठी चित्रपटसृष्टीतही वेगळी ओळख निर्माण केली आहे.



गौरव सध्या चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त लंडनमध्ये गेला आहे. तेथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाला त्याने भेट दिली. याचा फोटो गौरवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या फोटोला त्याने “भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना. कोणते आकाश हे, तू आम्हा नेले कुठे, तू दिलेले पंख हे, पिंजरे गेले कुठे? या भराऱ्या आमुच्या, ही पाखरांची वंदना. तुमच्यामुळे आज आमच अस्तित्व आहे. आमच्या श्वासावर तुमचे उपकार आहेत बाबा”, असं कॅप्शन दिलं आहे.लंडनमधील फोटो गौरवने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरु शेअर केले आहेत. 

गौरवसह अभिनेता भरत जाधव, निखिल चव्हाण आणि माधुरी पवारही चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने लंडनमध्ये आहेत. याआधी गौरव हवाहवाई चित्रपटात झळकला होता.गौरवचा चाहता वर्ग फार मोठा आहे. विनोदी अभिनयाने त्याने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. गौरव सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. लंडनच्या रस्त्यावरील अभिनेता भरत जाधव आणि निखिल चव्हाण यांचा व्हिडीओही प्रचंड व्हायरल झाला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने