भारत-चीन व्यापार १०० अब्ज डॉलपर्यंत

 बीजिंग : भारत आणि चीनमधील द्विपक्षीय व्यापार वाढत असून पहिल्या नऊ महिन्यात तो १०० अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक आहे, तर या काळात भारताचा व्यापारात ७५ अब्ज डॉलरची घट झाली आहे. याच कालावधीत द्विपक्षीय व्यापार १०३.६३ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. ही वाढ गेल्यावर्षीच्या तुलनेत १४.६ टक्के अधिक आहे.



चीनच्या सीमा शुल्क विभागाच्या सामान प्रशासनाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. भारताला चीनने केलेल्या निर्यातीमध्ये ३१ टक्के वाढ आहे. म्हणजे ही वाढ ८९.९९ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. दुसरीकडे या जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात भारताची निर्यात ३६.४ टक्के घट असून १३.९७ अब्ज डॉलर आहे. यामुळे एकूण व्यापारातील घट ७५.६९ अब्ज डॉलरहून अधिक झाली आहे. गेल्यावर्षी भारत आणि चीन दरम्यान द्विपक्षीय व्यापार विक्रमी १२५ अब्ज डॉलरवर पोहचली होती. गेल्यावर्षी भारताला चीनकडून ४६.२ टक्के निर्यातीत वाढ झाली होती. हा व्यापार ९७.५२ अब्ज डॉलर झाला होता. याच काळात चीनला भारताकडून ३४.२ टक्के निर्यात वाढ झाली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने