लग्नाचे आमिष दाखवून तृतीय पंथीयावर अनैसर्गिक अत्याचार, आर्थिक लुबाडणूक, मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

कोल्हापूर : लग्नाचे आमिष दाखवून तृतीय पंथीयावर अनैसर्गिक अत्याचार करून आर्थिक लुबाडणूक, मारहाण केल्याप्रकरणी ऋषिकेश बबन परमाज (रा.हेरले,ता.हातकणंगले) याच्या विरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



३४ वर्षीय फिर्यादी पीडिता तृतीयपंथीय घरकाम, देवदासी असून परिवारासह कबनूर (ता.हातकणंगले) येथे राहण्यास आहे. मे २०१८ मध्ये इचलकरंजी येथे ऋषिकेशशी ओळख आणि नंतर प्रेम संबंध निर्माण झाले. ऋषिकेशने लग्नाचे आमिष दाखवून इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. ९ जुलै रोजी अथणी जि.बेळगाव येथील एका मंदिरात दोघांनी लग्न केल्यानंतर वकिलांकडे कायदेशीर कागदपत्रे तयार केली. दोघांचाही एकत्र संसार सुरू असताना त्याने कामधंद्यासाठी साडेतीन लाख रुपये घेतले. तर १७ ऑगस्ट रोजी जयसिंगपूर येथे त्याने सोन्याचे दागिने काढून घेवून येथेही अनैसर्गिक अत्याचार केला. यावेळी त्याच्यासोबत त्याचे इतर दोन अनोळखी साथीदार होते. मारहाण करुन कोणास न सांगण्याची धमकी देत त्यांनी घरी सोडले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

अधिका-यांवर गंभीर आरोप
तृतीयपंथीयाने विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्यासह जिल्हा पोलीस प्रमुखांना तक्रार अर्ज दिला असून जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पो.निरीक्षक राजेंद्र मस्के व त्यांच्या कर्मचा-यांकडून आपल्याला अपशब्दांसह अवमानास्पद वागणूक मिळाली आहे. तसेच पोलिसांनी आपली वैद्यकीय तपासणी केली नसल्याचा आरोपही या अर्जात केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने