बाजूपट्ट्या ठरताहेत अपघातास कारण

कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्द सोडताच उपनगरे, गावांना जोडणारे रस्ते हे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली आहेत. यात रस्त्यांवरील खड्डे भरणे, डागडुजी करणे, पावसाळ्यातील पाण्याचा निचरा करण्यासाठी चरी मारणे, बाजूपट्टी स्वच्छ राखणे, गतिरोधक, मार्गदर्शक, दिशादर्शक फलक लावणे अशी रस्ता डागडुजीची कामे मैलकुली कामगार करतात. मात्र, पाच-सहा वर्षांपासून विभागाकडे मैलकुली नसल्याने विभागाच्या हद्दीत असणाऱ्या रस्त्याच्या बाजूपट्ट्या सध्या अपघातास कारण बनत असल्याचे चित्र कोल्हापूर-कंदलगाव रस्त्यावर दिसत आहे. आर. के. नगर खडीच्या गणपती मंदिरासमोरील चढतीवरील वळण बाजूपट्टीवर वाढलेल्या गवतामुळे धोकादायक ठरत असून, यामुळे अपघात होत आहेत. त्यात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

रस्ते चकाचक, बाजूपट्टीकडे दुर्लक्ष...

दक्षिण परिसरातील उपनगरे, गावांचा विचार केला, तर येथील रस्ते चांगले असल्याचे पहावयास मिळते. मात्र बाजू पट्ट्यावर गवत, काटेरी झुडपे उगवली आहेत. त्यामुळे रस्ते धोकादायक बनले आहेत.



ग्रामपंचायतीची मनधरणी...

जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाकडे सध्या मैलकुली नसल्याने शहराशेजारील पाचगाव, मोरेवाडी, कंदलगावसह इतर गावांतील मुख्य रस्त्यांची डागडुजी, स्वच्छता रखडली आहे. या स्वच्छतेसाठी स्थानिक ग्रामपंचायतींना विनवणी करण्याची वेळ आली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने