काँग्रेसला 'याच' सक्षम हातांची गरज; मनिष तिवारी स्पष्टच बोलले.

 नवी दिल्ली : काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनीही आता जी-२३ परिषदेचे सहकारी शशी थरुर यांना बेदखल करीत मल्लिकार्जून खर्गे यांचं कौतुक केलं आहे. मनिष तिवारी हे खर्गेंच्या प्रस्तावकांपैकी एक होते.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे आणि शशी थरुर हे दोन उमेदवार मैदानात आहेत. काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी खर्गे यांचं तोंडभरु कौतुक केलं आहे. काँग्रेस पक्षाची घडी सावरण्यासाठी अशाच सक्षम हातांची गरज असल्याचं तिवारी म्हणालेत.'खर्गे यांनी आपल्या आयुष्यातील ५० वर्षांपेक्षा जास्त काळ काँग्रेसच्या सेवेसाठी घालवला आहे. त्यामुळेच सुरक्षित हातांमध्ये पक्षाची धुरा असायला हवी. खर्गेंनी पक्षाच्या सर्वात खालच्या पदापासून काम केल्याने त्यांचा अनुभव दांडगा आहे.' अशा भावना तिवारी यांनी बोलून दाखवल्या.



दरम्यान, येत्या १७ ऑक्टोबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. तर १९ ऑक्टोबरला निकाल घोषित होईल. तब्बल २२ वर्षांनंतर देशाच्या सर्वात जुन्या पक्षासाठी निवडणूक संपन्न होत आहे. निवडणुकीच्या रिंगणात खर्गे आणि थरुर हे दोन उमेदवार आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय यांनी खर्गे यांच्या समर्थनार्थ आपलं नाव माघारी घेतलं होतं. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने