घर घेऊ पाहणाऱ्यांचा हिरमोड; दिवाळीत सोडत नाहीच!

मुंबई  म्हाडाच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या किमतीमध्ये घरे दिली जातात. मात्र यंदाच्या दिवाळीत म्हाडाच्या लॉटरीचा अर्ज भरू पाहणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या आनंदावर मात्र पाणी पडणार आहे. यंदा म्हाडाची लॉटरी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.म्हाडाच्या ४ हजार घरांसाठी दिवाळीत लॉटरी निघणार होती. मात्र याची शक्यता आता अगदीच नगण्य झाली आहे. त्यामुळे यंदाची लॉटरी लांबणीवर पडणार आहे. 


म्हाडाच्या लॉटरीच्या सॉफ्टवेअरचं सध्या काम सुरू आहे. हे काम अजून पूर्ण झालेलं नाही. ते सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे ही लॉटरी प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे घराचं स्वप्न पाहणाऱ्यांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. यंदा ४ हजार घरांसाठी सोडत निघणार होती. पण आता ही प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. पुन्हा घरांची सोडत कधी निघणार, याबाबत लवकरच अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. सॉफ्टवेअरचं काम पूर्ण झालं की या सोडत प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, अशी माहिती आहे. या नव्या सॉफ्टवेअरमध्ये काही बदलही असणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने