दिवाळी सणाचा गोडवा कमी होणार; दुधाचे दर आणखी वाढणार?

 मुंबई : राज्यात महागाईचा भडका उडाला आहे. सणासुदीच्या तोंडावर तेल, डाळी, दूध यांचे दर वाढले आहेत. त्यातच आता लम्पी आजारामुळे पशुधन कमी झाल्यामुळे दूध टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नुकतेच दुधाचे दर वाढले असताना जानेवारी ते मार्च दरम्यान दुधाचे दर आणखी 5 ते 6 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

देशातील अनेक राज्यात लम्पी स्कीन आजार पसरला आहे. महाराष्ट्रातही विविध जिल्ह्यात जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पशुपालक चिंतेत आहेत. लम्पी आजारामुळे पशुधन कमी झाल्याने दूध टंचाई निर्माण होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. त्यामुळं जानेवारी ते मार्चदरम्यान दुधाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. या काळात दूध दरात 5 ते 6 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.



लम्पी आजारसह चाऱ्याची कमतरता

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुधाच्या दरात वाढ झाली आहे. हे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान देशात दुधाची टंचाई निर्माण होऊ शकते, असं निरीक्षण इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक चेतन नरके यांनी नोंदवलं आहे. जनावरांना झालेल्या लम्पी आजारामुळं पशुधन कमी झालं आहे. तसंच चाऱ्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. याशिवाय यावेळी दूध पावडरचं उत्पादनही घटलं आहे. त्यामुळं जानेवारीनंतर दूध संकलन कमी झाल्यानंतर मागणीप्रमाणं पुरवठा होण्याची शक्यता कमी झाली आहे. आताच्या घडीला अमूलसह देशभरातील दूध संघांनी दूधाचे दर वाढवले आहेत. हे दर आणखी पाच ते सहा रुपये प्रतिलिटर वाढू शकतात, असा अंदाज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने