दिवाळीचा मुहूर्त जॅकलिनसाठी ठरेल का लकी? अभिनेत्रीच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

मुंबईः  200 करोडच्या फसवणूकीच्या प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस कडून दाखल करण्यात आलेल्या नियमित जामीन अर्जावर आज २२ ऑक्टोबर रोजी पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी आहे. पटियाला हाऊस कोर्टात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस दुपारी २ वाजता हजर राहणार आहे. पटियाला हाऊस कोर्टाकडून जॅकलिनला मिळालेल्या जामीनाचा ईडी कदाचित विरोधही करू शकते. गेल्या सुनावणी दरम्यान कोर्टानं जॅकलिन फर्नांडिसला अंतरिम जामीन मंजूर केला होता.कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरच्या २०० करोडच्या मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात जॅकलिन सहआरोपी आहे. या प्रकरणात ईडी ने १७ ऑगस्टला एक चार्जशीट दाखल करत जॅकलिनला त्यात आरोपी म्हणून दर्शवलं होतं. यानंतर कोर्टानं तिला समन्स पाठवलं होतं. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपी म्हणून नाव समोर आल्यानंतर जॅकलिनच्या वकीलांनी तिच्या जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.



त्यादरम्यान जॅकलिन फर्नांडिसला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टातर्फे अंतरिम जामीन दिला गेला होता. पण या केस प्रकरणात आता जॅकलिनला नियमित जामीन मंजून व्हावा यासाठी सुनावणी होणार आहे. एका इंग्रजी न्यूज पोर्टलला मिळालेल्या माहितीनुसार जॅकलिन फर्नांडिसच्या वकीलांनी सांगितले आहे की,शनिवारी २२ ऑक्टोबर रोजी आम्ही दिल्लीच्या विशेष कोर्टात हजर राहणार आहोत. त्यावेळी जॅकलिनच्या नियमित जामीन अर्जावर अंतिम निर्णय देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. माहितीसाठी इथं फक्त नमूद करतो की, गेल्या वर्षभरापासून कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरच्या मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात नाव आल्यामुळे जॅकलिन फर्नांडिस चर्चेत आहे.

ईडीनं सुकेश चंद्रशेखर केस प्रकरणात जॅकलिनची कसून चौकशी केली आहे. इडीच्या चौकशी दरम्यान जॅकलिननं त्यांना पू्र्ण सहकार्य केल्याचं निदर्शनास आलं आहे. ईडीच्या चौकशी दरम्यान एकदा जॅकलिनने सांगितलं होतं की ती सुकेशवर तिचं प्रेम होतं. इतकंच नाही तर तिला त्याच्याशी लग्न देखील करायचं होतं. आता जॅकलिनला या प्रकरणात नियमित जामीन मिळतो की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने