Ram Setu Vs Thank God : आ देखे जरा किसमे कितना है दम...

मुंबई : दिवाळी, होळी, ईद आणि ख्रिसमस या सणांच्या दिवशी चित्रपटांच्या रिलीजला वेगळेच महत्व असते. त्यामुळे यानिमित्ताने चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा आधीच केली जाते. बॉलिवुडचा भाईजान म्हणजेच सलमान खानचे बरेचसे चित्रपट ईदला प्रदर्शित होतात तर आमिर खानचा चित्रपट ख्रिसमसला प्रदर्शित होतो.

बऱ्याचदा दोन मोठ्या बजेटचे चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाल्याचेही आपण पाहिले आहे. तशीच टक्कर आता पुन्हा पहायला मिळणार आहे. यावेळी अक्षय कुमारचा 'राम सेतू' आणि अजय देवगणचा 'थँक गॉड' हे चित्रपट २५ ऑक्टोबरला दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहेत.गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे सण उत्सव साजरा करता आले नाही. देशातील सर्वच उद्योगांना याचा फटका बसला. त्यामध्ये बॉलिवूडचाही सावावेश होता. बऱ्याच बिग बजेट चित्रपटांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मोठ मोठे सिनेमे सोशल प्लॅटफॉम्सवर रिलीज करावे लागले. आता कुठे चित्रपटसृष्टीची स्थिती सुधारू लागली. सध्या सगळेच सण निर्बंधमुक्त साजरे केले जात आहेत. त्यामुळे आता  प्रेक्षकवर्ग पुन्हा सक्रिय झाला. मात्र बॉलिवूडवर बॉयकॉटचे ढग दाटत आहे. अशातच दोन मोठ्या सिनेमांची लढत रंगणार आहे.



इंद्र कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपट अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा, रकुल प्रीत सिंग यांच्या भुमिका आहेत.'थँक गॉड' २५ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तर या चित्रपटात अक्षय कुमारसोबत नुसरत भरुचा आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्याही भूमिका आहेत. 'राम सेतू'ची कथा नास्तिक पुरातत्वशास्त्रज्ञ आर्यन कुलश्रेष्ठ म्हणजेच अक्षय कुमार याच्याभोवती फिरतांना दिसते.यानंतर, आर्यन 'राम सेतू' च्या पौराणिक कथा आणि विज्ञानाच्या तंत्राने त्याचे सत्य शोधण्याचा प्रर्यत्न करत आहे.

दरम्यान 'थँक गॉड' हा चित्रपट रिलिज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अनेकांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.तर अक्षयच्या 'राम सेतू'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतांना दिसतोय. त्यामुळे याचा फायदा नक्कीच अक्षयला मिळणार असल्याच बोललं जात आहे.  त्यामुळे आता कोणता चित्रपट प्रेक्षकांच मनोरंजन करण्यास अशस्वी ठरतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने