National Games 2022 : तलवारबाजीत महाराष्ट्राची पदकांची पंचमी

 गांधीनगर : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी फेन्सिंग (तलवारबाजी) या खेळामध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पाच पदकांची माळ आपल्या गळ्यात घालत ऐतिहासिक प्रदर्शन केले. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी या खेळात एक रौप्यपदक आणि चार ब्राँझपदकांना गवसणी घातली. तलवारबाजीतील सेबर सांघिक प्रकारात महाराष्ट्राच्या पुरुष संघाने ब्राँझपदक जिंकले. सेबर सांघिक मुलांमध्ये महाराष्ट्राचा सामना उपांत्यपूर्व लढतीत बलाढ्य जम्मू काश्मीर संघासोबत झाला. अत्यंत अटीतटीच्या लढतीत महाराष्ट्राने (४५- ४३) अवघ्या दोन गुणांनी मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत महाराष्ट्राची लढत पंजाब संघासोबत झाली. पंजाब संघााने ४५-३३ अशा मोठ्या फरकाने महाराष्ट्र संघाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीतील पराभवामुळे महाराष्ट्र संघास ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. पदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या संघात अभय शिंदे, धनंजय जाधव, श्रीशैल शिंदे व ऋत्विक शिंदे यांचा समावेश होता.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने