‘स्वभिमानी’च्या ऊस परिषदेवर पावसाची शक्यता; संयोजकांनी लढवली बैठकीची अनोखी शक्कल, म्हणाले..

 कोल्हापूर : माघारी निघालेला परतीचा पाऊस पुन्हा बरसू लागला असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उद्या शनिवारी होणाऱ्या ऊस परिषदेवर पाणी फिरणार की काय असे चित्र निर्माण झाले आहे. हि स्थिती लक्षात घेवून संयोजकांनी परिषदेच्या पूर्वसंध्येला एक अनोखी शक्कल लढवली आहे. सभास्थानी चिखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन दीड फूट उंचीची लाकडी बैठक व्यवस्था जयसिंगपूरच्या विक्रमसिंह पटांगणावर मांडली आहे.पावसापासून रक्षण करून सभा पार पाडण्यासाठीची ही पहिलीच पद्धत चर्चेची ठरली आहे.दरवर्षी उस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद होत असत. कारखान्यांनी ऊस दर किती द्यावा आणि तो न दिल्यास होणाऱ्या आंदोलनाबाबत चर्चा करून घोषणा केली जात असल्याने भूमिका समजून घेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातून शेतकरी मोठ्या संख्येने जयसिंगपूरला येत असतात.



पावसातही परिषद होणार

तथापि यावर्षी ऊस परिषदेवर परतीच्या पावसाचा काळोख दिसत आहे. गेली चार-पाच दिवस कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे . त्यावर संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भर पावसातही परिषद होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

भारतीय बैठकच पण…

परंतु सभास्थानी सभेच्या ठिकाणी नेहमी भारतीय बैठकीची आसन व्यवस्था असते. त्यामुळे पटांगणावरील चिखलात बैठक कशी मारायची असा प्रश्न उद्भवला आहे. त्यावर संयोजकांनी सभास्थळी दीडफुट उंचीची बैठक व्यवस्था केली आहे. तीन फूट बाय सहा फूट आकाराचे लाकूड लोखंडी पट्ट्यांवर टाकले आहे. अशी रचना संपूर्ण मैदानात दिसत आहे. व्यासपीठावरही अशीच सोय केली आहे. पावसापासून रक्षण करून सभा पार पाडण्यासाठीची ही पहिलीच पद्धत चर्चेची ठरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने