जेव्हा अमिताभ बच्चन यांनी प्रचार करूनही निवडणूक हरले होते मुलायम सिंह यादव; दोघांच्या मैत्रीचा खास किस्सा

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशाच्या राजकारणातील एक महत्त्वाचा चेहरा म्हणजे ‘मुलायम सिंह यादव’. १० ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांचे उपचारा दरम्यान निधन झाले. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे (सपा) संस्थापक म्हणून मुलायम सिंह यादव ओळखले जातात. याशिवाय त्यांची एक वेगळी ओळख म्हणजे त्यांचे आणि बच्चन कुटुंबियांचे जवळचे संबंध होते. अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन या समाजवादी पक्षाशी संबंधित आहेत. मुलायम सिंह यादव हे बच्चन कुटुंबियांच्या विवाह सोहळ्यांना आणि समारंभांना नेहमी हजेरी लावत असत. याच मुलायम सिंह यादवांनी अमिताभ बच्चन यांना ब्रँड अँबेसेडर बनवले होते.



ही घटना २००७ सालातली आहे. मुलायम सिंह यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अमिताभ बच्चन यांना यूपीचे ब्रँड अम्बेसेडर बनवले. वास्तविक, त्यावेळी समाजवादी पक्षाचा मोठा चेहरा समजले जाणारे दिवंगत नेते अमर सिंह यांच्याशी अमिताभ बच्चन यांची खास मैत्री होती. दरम्यान, अमिताभ बच्चन यांची यूपीचे ब्रँड अम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यादरम्यान बिग बींनी पक्षाचा प्रचारही केला होता. मात्र याचा फायदा मुलायम सिंह यादव यांना झाला नाही, उलट नुकसान झाले. अमिताभ बच्चन यांनी आपल्या दमदार आवाजातून “यूपी में बहुत दम है, क्यूंकी जुर्मा यहाँ कम है” ला प्रमोट करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता, पण त्याचा परिणाम सकारात्मक होण्याऐवजी अगदी उलट झाला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने