अखेर प्रतीक्षा संपली; ‘पुष्पा द रुल’च्या चित्रीकरणाला सुरुवात, फोटो शेअर करत रश्मिका म्हणाली…

मुंबई : २०२१ या वर्षी केवळ एकाच चित्रपटाने सारं बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं, तो चित्रपट म्हणजे ‘पुष्पा’. ओटीटीवर प्रदर्शित होऊनही बॉक्स ऑफिसवर लोकांनी या चित्रपटासाठी तोबा गर्दी केली. चित्रपटाची गाणी चांगलीच गाजली, त्यावर कित्येक रील आणि मीम्स व्हायरल झाले. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहादचा अभिनय सगळंच लोकांना प्रचंड आवडलं आणि तेव्हापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या पुढील भागासाठी आस लावून बसले आहेत.



प्रेक्षकही चांगलेच उत्सुक झाले होते. आता त्यांच्या उत्सुकतेत आणखीन भर पडणार आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये ‘पुष्पा द रूल’ या दुसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात होते. त्यानुसार आता या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असल्याचे समोर आले आहे. Mythri Movie Makers च्या इस्टाग्राम अकाउंटवरून नुकताच ‘पुष्पा द रुल’च्या सेटवरील एक फोटो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये चित्रपटाची टिम मन लावून काम करत असल्याचे दिसत आहे.अभिनेत्री रश्मिका मंदानाने यावेळचा एक फोटो ट्विटरवर फोटो शेअर करत शूटिंग सुरु झाल्याची माहिती दिली. तिने लिहिले, “ते बघा…चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे…” ही पोस्ट शेअर करताना ती खूप उत्सुक असल्याचे दिसते.

गेल्या वर्षी १७ डिसेंबरला ‘पुष्पा’ हा चित्रपट रिलीज झाला होता. यामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत दिसले. हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला. हा चित्रपट मूळतः तेलुगुमध्ये शूट करण्यात आला होता आणि नंतर तो हिंदीसह इतर भाषांमध्ये डब करण्यात आला होता. ‘पुष्पा’ ने जगभरात ३५० कोटींहून अधिक कलेक्शन केले. त्यापाठोपाठ ‘पुष्पा २’ चित्रपटाचे बजेट ४५० कोटी असल्याचे सांगितले जात आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने