मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला; अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिंदे गटाला पाठिंबा देणार?

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेणार आहेत. ही भेट नेमकी कशासाठी आहे, हे अद्याप उघड झाले नसले तरी अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच या भेटीमुळे अनेक राजकीय चर्चांनाही उधाण आहे. या बैठकीत शिंदे गटाचे मंत्रीही उपस्थित राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.



मनसे यापूर्वी अंधेरी पोटनिवडणुकीत तठस्थ राहणार असल्याची माहिती होती. तसेच राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली असून अशा परिस्थिती मनसेला मोठी संधी आहे, असे मनसेच्यावतीने सांगण्यात आले होते. मात्र, आता एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर राज ठाकरे अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिंदे गटाला पाठिंबा देतात का? याचबरोबर आगामी मनपा निडणुकीसाठी या दोघांध्ये युतीबाबत काही चर्चा होईल का? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने