आधी नाना पाटेकरांच्या पाया पडला अन् नंतर…, रणवीर सिंगचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

मुंबई : रणवीर सिंह हा एनबीए इंडियाचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आहे. काही दिवसांपूर्वी त्याने दुबईवारी केली होती. दुबईमधील आबू दाबी शहरात नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन तर्फे ‘एनबीए आबू दाबी गेम्स २०२२’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला रणवीरने हजेरी लावली होती. त्याने तेथे जाऊन अनेक एनबीए स्टार्संसह लोकप्रिय बॉलिवूडच्या गाण्यांवर डान्स केला. दरम्यान मुंबईमध्ये परतल्यानंतर तो एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होता. या सोहळ्यामधला त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.



लोकमतच्या एका पुरस्कार सोहळ्यामध्ये नाना पाटेकर, रणवीर सिंह यांसारख्या कलाक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बरेचसे राजकीय नेतेही हजर होते. तेव्हा रणवीरने व्यासपीठावर जाऊन ‘बाजीराव मस्तानी’ या सुपरहिट चित्रपटातील ‘मल्हारी’ हे गाणं गाऊन दाखवलं. या कार्यक्रमादरम्यान तो मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत होता. पुढे त्याने ‘८३’ चित्रपटातील गाणं गात तिरंगा फडकवला.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने